पुराचा पाण्यात वाहून जाताना एका दुचाकी स्वाराला नागरिकांनी वाचवले .. आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 च्या दरम्यान नांदेड जिल्हयातील देगलुर तालुक्यातील टाकळी येथील ही घटना आहे .. लेंढी नदीवरील पूलावरुन मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे .. एक दुचाकी स्वार जात होता . मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी वाहत जात होती .. तिथं असलेल्या एका तरूणाने धावत जाऊन वाहणारी दुचाकी धरली .. नंतर अन्य लोकांनी हाताची साखळी करुन दुचाकी स्वाराला पाण्या बाहेर काढून दुचाकी स्वराचे प्राण वाचवले