तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे आज दि. 26 ऑगस्ट रोज मंगळवारला सकाळी 10 वा.पासून दुपारी 2 वा. पर्यंत आ. राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीत रोगनिदान शिबिर पार पडला. सदर शिबिराचे आयोजन तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान घेण्यात आले असून या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याची तपासणी केली. याप्रसंगी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते.