बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणात काका आणि त्याच्या मुलाने युवकाला जबर मारहाण केल्याने त्याचा जीव गेला.