भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील जिओ पेट्रोल पंप समोर धारगाव येथे आज दि 28 ऑगस्ट रोजी रात्री 1.30 वा. दरम्यान सनी राजू नेवारे वय 32 रा. भिलाई छत्तीसगड व आकाश गणेश राऊत वय 26 रा. बर्डी जिल्हा नागपूर हे मो. सा. क्र. CG 07 CN 6203 ने साकोली कडून नागपूरला जात असता धारगाव येथे त्यांची मोटर सायकल अनियंत्रित झाल्याने डिव्हायडरला आदळली. त्यात सनी व आकाश यांचे पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाले आहेत.