मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत उपोषण सुरू असल्याने सदर उपोषणाच्या समर्थनार्थ आज मंगळवारी दुपारी राहुरीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. सुमारे तासभर झालेल्या या रास्तारोकोने रस्यांच्या दुतर्फा वाहणांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आंदोलकर्तांनी आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिले आहे.