पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला शनिवार दि. 23 ऑगस्टला सकाळी 11वा.पासून रामटेक शहरात विविध मंडळांद्वारे मारबत रॅली काढण्याची परंपरा कायम ठेवत रामटेक शहरातील रोगराई घेऊन जा गे मारबतच्या जल्लोषात विविध मंडळांद्वारे 3 मारबत रॅली काढण्यात आल्या. पिंपळेश्वर मंदिर टिळक वार्ड, शनिवारी वार्ड व रामतलाई धार्मिक मैदान रामटेक येथून मारबत काढून त्या रामटेक शहराच्या मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळी पोहोचल्या येथे दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मोठ्या जल्लोषात त्यांचे दहन करण्यात आले.