पुणे जिल्हा दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारकाच्या नूतनीकरणच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांसह स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी आ. ज्ञानेश्वर कटके व मान्यवर उपस्थित होते.