जिल्ह्यातील विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रियेची कार्यवाही १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत दिले. बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा मीना, सीईओ अनिता मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. मान्यतांअभावी निधी अखर्चित राहू नये, विकासकामांना गती देण्यासाठी अडथळे दूर करावेत, असेही फुंडकर यांनी स्पष्ट केल