अनोळखी चोरटयाने वरोरा येथे घराचा मागील दरवाजा तोडुन आत प्रवेश करून घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असतांना घराचा मागील दरवाजा न तुटल्याने सदर चोर हा तिथुन पळून गेला. अशा रिपोर्ट वरून पो.स्टे. वरोरा येथे कलम ३०५ (अ), ३३१ (४), ६२ भा. न्या.सं.२०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.सदर गुन्हा दाखल होताच वरोरा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवुन केलेल्या तांत्रीक तपासच्या आधारे आरोपी दिवाकर उर्फ देवा गोलकोंडावर याला शिवाजीनगर भद्रावती येथून आज दि २ ऑक्टोबर ला १२ वाजता अटक करण्यात आली.