"पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताने लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका खाजगी नोकरी करणाऱ्या महिलेवर तब्बल आठ वर्षे वारंवार नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. या अत्याचारातून ती महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. भारत प्रभाकर राठोड (रा. परळी, बीड ह. मु. पनवेल), विशाल राठोड, राहुल ( रा. उदगीर, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी ठाण्यात ३९ वर्षीय पीडितेने तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारत राठोड हा पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्र. २ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.