येवदा पोलिस स्टेशन अर्तंगत येणाऱ्या नांदरुन येथिल ४२ वर्षीय बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह हा गावतलावातच मंगळवार (दि.२६) रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.रविंद्र गुलाबराव आळे (वय.४२) रा. नांदरुन असे मृत इसमाचे नाव आहे.दि २२ ऑगस्टच्या रात्रीपासून सदर इसम बेपत्ता होता.त्याबाबतची तक्रार कुटुंबातील सदस्यांनी दि.२३ऑगस्टला येवदा पोलिस स्टेशन येथे दिली होती.दरम्यान पाच दिवसानंतर मंगळवारी त्यांचा मृतदेह गावतलावात तरंगताना आढळला.