ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुरूकुल कॉलनीतील एका हॉलीडे टूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.