कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असून,अशा निकृष्ट रस्त्यावर टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे रस्त्याची कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून, त्यांनी कोल्हापूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकृष्ट रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे प्रवाशांमध्ये आशा निर्माण झाली आहे.