धारूर तालुक्याती ढग फुटी सदृश पाऊस झाला असून यामुळे नद्याला पुर, तळे ओसंडून वाहत आहेत. झालेल्या पावसाने वाण नदीला पूर आल्याने रुई धारूर, अंजनडोह या दोन गावा मधील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे (४२) वाहून जात मृत्यू मुखी पडले. वाण नदीवरील रुईधारूर व अंजनडोह या गावाच्या मधील पुलावर पाणी आल्याने चार चाकी गाडी वाहून गेल्याची घटना घडली. यात अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन कांबळे (४२) यांचा मर्त्य झाल्याची घटना घडली आहे.