लळीद म्हणजे रामायण व महाभारत या महाकाव्य संग्रहातील सजीव देखावा दातर्ती गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.ग्रामीण भागात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा म्हणजे " लळीद " ही दातर्ती गावात आजही कायम आहे.या पारंपरिक कार्यक्रमात कलाकारांनी रामायण महाभारतातील पात्र तसेच विविध देवतांच्या भूमिका साकारून उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वीर एकलव्य मित्र मंडळ व पुर्ण आदिवासी भिल्ल समाज अग्रेसर होता.