बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा प्रकल्पातून ७७,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे येलदरी धरणातून आज रविवार 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने येलदरी धरणाखालील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने जिंतूर - सेनगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.