वाशिम तालुक्यातील अनसिंग पोलीस स्टेशन येथे 2 मोटर सायकल चोरी प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण वय 26 वर्ष रा. अश्विनपुर ता. पुसद जि. यवतमाळ ह.मु.कात्रज पुणे याच्याकडून दोन मोटरसायकल अंदाजे किंमत 90 हजार रुपये असा ऐवज जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी पोलिसांच्या वतीने देण्यात आली. सदरची कार्यवाही जि. पो. अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षिका श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. यांनी केली.