: लोहगाव तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात विमानांच्या उड्डाणावेळी अपघात टाळण्यासाठी प्रखर बीम म लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे. भारतीय वायुसेनेने निदर्शनास आणून दिल्यानुसार, विविध कार्यक्रमांदरम्यान आकाशात सोडण्यात येणाऱ्या बीम लाईट व लेझर बीम लाईटमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात ह