जिंतूर शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे जिंतूर शहरातील अनेक दुकानाच्या पाट्या उडून गेल्या. तसेच शहरातील तहसील कार्यालयासमोरील झाड कोसळल्याने खूप वेळ वाहतुकिस अडथळा निर्माण झाला होता.