कोल्हापूर- सांगली- सातारा या तीन जिल्ह्यांच्या एकात्मिक आणि शाश्वत विकासाला दिशा देण्यासाठी कोल्हापूर-सांगली-सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या मांडणीसाठी विशेष कार्यक्रम रविवारी दुपारी चार वाजता कोल्हापूरात पार पडला. या उपक्रमांतर्गत या तीन जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी स्थानिक उद्योग आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन, उद्योग विकासातील नवीन कल्पना, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर, यासह कला, क्रिडा, साहित्य, संस्कृती, पर्यटन या विषयावर चर्चा झाली.