पुणे – सहकारनगर परिसरात फिर्यादीस मारहाण करून दोन मोबाईल जबरीने लुटणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. चव्हाणनगर कमान चौकाजवळ फिर्यादीस मोपेडवरून आलेल्या तिघांनी धडक देत शिवीगाळ केली. दहा हजार रुपयांची मागणी न मानल्याने त्यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोन मोबाईल हिसकावून नेले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अंमलदारांना