दर्यापूर मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिना निमित्त आज सकाळी आठ वाजता पासून बारा वाजेपर्यंत श्रीकृष्ण मंदिर येथून आगार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,गांधी चौक येथून नवीन नगरपरिषद मार्गे श्रीकृष्ण मंदिर इथपर्यंत भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.सदर शोभायात्रेमध्ये पालखी,श्रीकृष्ण व चक्रधर स्वामी यांचे वेशभूषा परिधान केलेले चिमुकले,डि.जे. ढोल टाळ दिंड्या फटाक्यांची आतिषबाजी तसेच पुरुष व महिला मंडळी यांच्या डोक्यावर बांधून महानुभाव पंथीयांनी उत्साहात अवतार दिन साजरा केला.