तुमसर तालुक्यातील पाथरी ते कवलेवाडा रस्त्यावर दि. 31 ऑगस्ट रोज रविवारला दुपारी 3 वा.च्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर कारवाई करत सदर ट्रॅक्टर एक ब्रास रेती असा एकूण 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक सुभाष नागपुरे यांच्या विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.