लातूर -राज्यात नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आज जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचं मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयांवर तीव्र प्रतिक्रिया देत खालील मुद्द्यांद्वारे सरकारची दिशाभूल उघड केली आहे.१. कर्जमुक्तीचं विसरलेलं आश्वासननिवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी “योग्य वेळ आल्यावर करू” असं सांगितलं.