केंद्राच्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण मेरिटमूळ केंद्राच्या शिष्यवृत्तीचा लाभ न मिळणाऱ्या मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सारथी मार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती. पण आत्ता ही शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली आहे असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज केला आहे.