भंडारा तालुक्यातील जुनी पिपरी येथे दि. २३ ऑगस्ट रोजी स. ९ वा. दरम्यान डीजेच्या तालावर वाजत गाजत मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हापोळ्याच्या दिवशी मार्बतीची मिरवणूक काढण्याची जुनी परंपरा आहे. मार्बतीच्या मिरवणुकीत एकोपाचा संदेश देण्यात आला. यावेळेस गावातील सर्व लोकांनी, महिलांनी, तरुणांनी व बालगोपालांनी सहभाग घेतले. गोसेखुर्द प्रकल्प बाधित विविध गावांचे पुनर्वसनाचे काम रखडलेले आहे. नव्याने गावांचे पुनर्वसन विषयी शासन बोलत नाही.