अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागांच्या सीमा जाहीर करण्यात आल्या. हरकती व सुचना सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.असून 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पर्यंत एकूण 9 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी प्रभाग क्र. 3 संदर्भात 3, प्रभाग क्र. 4 बाबत 1, तर प्रभाग क्र. 8 संदर्भात 2 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. उर्वरित हरकती इतर प्रभागांबाबत आहेत. अंतिम मुदतीपूर्वी आणखी हरकती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.