सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात असलेल्या दत्तप्रसाद शिरसाट यांच्या स्टेशनरी दुकानाला आज रविवार १० ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तात्काळ मदतीमुळे तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग वेळीच विझविण्यात यश आल्याने परिसरातील इतर दुकाने आणि घरांना असलेला धोका टळला.