सैन्य दल,नौदल आणि विविध शासकीय सेवातील अधिकाऱ्यांसह दक्षिण भारतातील देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी कोरेगाव आगाराने सातारा सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. शहरप्रमुख उल्काताई मालुसरे व ललिताताई पोतदार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या व्यवस्थापिका नीता जगताप यांची शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भेट घेऊन निवेदन सादर केले.