इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अंमल व्हावा या हेतूने ईद-ए-मिलाद निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जी या पठाण यांच्या पुढाकाराने मुंब्रा येथे मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. मोहम्मद पैगंबर यांची मानवी मूल्य,शांतता आणि मानवतेचा संदेश वेगवेगळे फलक हातात घेऊन त्या माध्यमातून दिला.