सध्या गणेशोत्सवाच्या दिवसांतही शहरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र शहरातील अंबाबाई पटांगण ते इंदिरा गांधी चौक, सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक, नवीन बसस्थानक ते पंढरपूर नगरपालिका असे प्रमुख वर्दळीचे रस्ते मोठमोठ्या खड्ड्यांनी भरून गेले असून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंढरपूर शहर प्रमुख संग्राम अभंगाराव यांनी पत्रकारांशी बोलताना आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता दिला आहे.