अंबरनाथ एमआयडीसी परिसरामध्ये एका कंपनीमध्ये सापाच्या नर-मादीची जोडी बसली होती. त्याची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि सर्पमित्र आकाश मोहिते यांनी सापाच्या जोडीला रेस्क्यू केले. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती दिली. ही तस्कर सापाच्या नर-मादी ची जोडी असून एकाची पाच फूट, एकाची चार फूट लांबी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.