भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर पासून ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर पर्यंत, ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून साक्री तहसील कार्यालयात मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत तालुक्यातील शेतकरी बांधवांना जिवंत सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले.