पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत दोन ट्रक एक चार चाकी यांचा अपघात झाला. या अपघातामुळे पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर वाहतूक पोलीस हे घटनास्थळी पोहोचले व यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झाली. सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा पोहचली नाही.