खामगाव शहरातील खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्द तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एकूण २९ मंडळांना आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक डॉ श्रेणिक लोढा यांनी भेट देऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांशी गणेश मंडळांबाबत चर्चा केली.सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.