पोलिस पाटलानेच जमीन खरेदीचा खोटा दस्त करून देत जवळपास २० लाखांची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झालेल्या कोपरगाव येथील एक रेशन दुकानदार किरण सिताराम डांगे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपी पोलिस पाटील दगु मोहन गुडघे (वय-५५) यांचे विरूध्द गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वा तालुका पोलिसांनी माहिती दिली आहे.दरम्यान या प्रकरणी चांदेकसारे येथील घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली