रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारींचा केंद्रबिंदू झालेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या संपता संपेना झाल्या आहेत. अस्वच्छतेचे माहेरघर बनलेल्या या उपजिल्हा रुग्णालयाची दस्तूर खुद्द आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार कृष्णा रुग्णालयाच्या स्वच्छता विषयक टीमने स्वच्छता करून दिली आहे. त्यांच्या या कृतीने रुग्ण आणि नातेवाईकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातून बुधवारी सकाळी ११ वाजता माहिती मिळाली.