हॅपीथॉन हा अनोखा हास्य संदेश देणारा अनोखा रोड शो आज पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालयात पार पडले.प्राचार्य डॉ.सुनील पांडे ,देवेंद्र गावंडे झोन ऑफिसर प्रवीण बनसोड, जेसीआयचे अध्यक्ष डॉ. कृष्णन बजाज, आयपीपी अजय अडोकार ,सप्ताप्रमुख शिरीष घाटोळ,प्रकल्प प्रमुख श्रेयस चावडा, सचिव देवानंद झाडे, आदींच्या यावेळी मंचावर उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.शिवाजी महाराज चौक येथे हॕपीथाॕनचा समारोप पार पडला.