जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत वर्ग चार संवर्गात कार्यरत असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना आज आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मोठा न्याय मिळाला आहे. कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर या योजनेचा प्रथम लाभ मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच कनिष्ठ सहाय्यक पदाची अधिकृत संरचना लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.