राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी वर्धा येथूनच देशाला स्वच्छता व आरोग्य सेवेचा मुलमंत्र दिला. त्यांच्या या मुलमंत्राचा स्विकार करत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना मानवतेच्या भावनेतून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.सेवाग्राम येथे महात्मा गांधी इन्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सचा स्थापन दिवस व पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.