Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: एनएचएम कर्मचाऱ्यांचा संताप :जिल्हाकचेरी समोर बैल पूजा करून आंदोलन

Akola, Akola | Aug 22, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून नियुक्ती आदेशही जारी झाले. मात्र अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. आम्ही बैलासारखं काम करतो, बैलांची पूजा तरी एक दिवस केली जाते; पण आमच्या मागण्या मात्र मान्य होत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्ते डॉ. नागे यांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us