बिगर शेतीबाबतचा बनावट व खोटा आदेश खरा असल्याचे भासवून मूळ शेतजमीन मालकाने खरेदीदारांचा विश्वास संपादन करून वासूद व सांगोला हद्दीतील दोन गटांतील मिळून सुमारे २ हेक्टर १७आर जमीन खरेदी दस्ताने विक्री करून तिघांची सुमारे ४३ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एड. गौरव सुनील चांडोले (रा. वासूद चौक, सांगोला) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी अशांक बाळकृष्ण चांदणे (रा. वासूद रोड, सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.