गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत ९ वर्षीय बालिकेला अश्लील स्पर्श करून छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजय राजकुमार गवई (४०, रा. वडाळी) याला तात्काळ अटक करून अवघ्या २२ तासांत न्यायालयात चार्जशीट दाखल केली. गाडगेनगर पोलिसांच्या या वेगवान कारवाईची शहरात सर्वत्र चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका महिलेने आपल्या मुलीसह शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला एका हॉटेलमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, ९ वर्षीय