स्टेशन विभागातील एका नगरातील ३० वर्षीय महिला बुधवार २० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान तिच्या घरात असताना आरोपी सनी दुबे,वैभव कोकाटे,योगेश कोकाटे,आकाश उईके,यश केसले उर्फ चिन्ना सर्व राहणार सत्संग भवन यांनी फिर्यादीच्या घरात घुसून अक्ष्लील शिवीगाळ करून विनयभंग केला तसेच कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्यादी प्राप्त होतात पाचही आरोपींना गुरुवार २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव सह कर्तव्यावरील अधिकारींच्या उपस्थितीत काढली धिंड.