तालुक्यातील नवे आढे येथे थाळनेर येथील 20 ते 25 युवकांनी हातांबुक्क्यांनी आणि लाठ्या-काठ्यांनी तसेच चाकू घेऊन बीएसएफ जवानासह तिघांवर हल्ला करीत जखमी केल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी 12 युवकांना ताब्यात घेत इतर 12 ते 15 युवकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या हल्ल्यात बीएसएफ जवान सुनिल पोपट पारधी (३५), त्याची पत्नी आणि नातेवाईक दिपक पोपट पारधी हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी बीएसएफ जवान सुनिल पोपट पारधी यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.