तागलखेड वेलतुरी येथील तलावाला मोठे भगदाड पडले, मोठ्या धोक्याची शक्यता, आष्टी तालुक्यातील तागलखेड वेलतूरी येथील तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. या भगदाडामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यातील पाण्याचा ताण वाढल्याने तलावाची भिंत अधिक कमजोर होऊ शकते, यामुळे शेतजमिनी, पिके तसेच शेजारील वस्त्यांवर संकट ओढवू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.