तालुक्यातील पाटाळा येथील एक अल्पवयीन मुलगी घरुन निघुन गेली होती. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न आढळल्याने या घटनेची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.माजरी पोलीसांनी याबाबत गुन्हा नोंदवून आपली तपासचक्रे फिरवित अवघ्या चोवीस तासात तिला हिंगणघाट तालुक्यातून ताब्यात घेत तिला तिच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहोचविले.चोविस तासात मुलीचा शोध लावल्याने माजरी पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.