सेवाग्राम, हे ऐतिहासिक गाव अनेक वर्षांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या नावाने निधी मिळत असूनही, स्थानिक ग्रामस्थांना मात्र मूलभूत सुविधांपासून दूर ठेवले जात आहे, अशी तक्रार आहे. आज 21 ऑगस्ट रोजी वर्धा दौऱ्यावर असताना आमदार राजेश बकाने यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा मुद्दा मांडला. असल्याचे रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे