नांदुरा रोडवरील चिखली फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.आईसाहेब मंगल कार्यालयात जवळील सूरज घादगे वय २५ वर्ष व सहा नंबर शाळेजवळील मुकेश शर्मा वय २८ वर्ष हे दोघे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच 28 बी वाय 0873 जात असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सूरज घादगे हा गंभीर जखमी झाला तर व मुकेश शर्मा हा ठार झाला.