रावेर तालुक्यात अजंदा हे गाव आहे. या गावा तून रावेर कडे जाणारा रस्त्यावर ओम साई तोल काटा आहे. त्याच्या शेजारी मनोहर वसंत महाजन राहतात. त्यांच्या घरात चोरी झाली आहे. घरातून टीव्ही इन्व्हर्टर आणि डीव्हीआर बॉक्स असा एकूण १३ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केला. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.